महत्वाची सूचना ! विद्युत पुरवठा लाईन पाऊसापासून सुरक्षित ठेवत गणेश मंडळांनी काळजी घ्यावी - अध्यक्ष नागेश जाधव
बारामती - सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे, गणेश मंडळे विविध स्वरूपाची विद्युत रोषणाई देखावे सादर करत असतात , दोन - तीन दिवसापासून सर्वत्र जोराचा पाऊस चालू आहे यामुळे विद्युत पुरवठा लाईन ही गणेश मंडळ शेड च्या जवळून बहुतांश गेलेल्या असतात विद्युत वाहिनी पासून कोणती दुर्घटना होण्याची शक्यता असते असे असताना गणेश मंडळांसह नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे तसेच गणेश उत्सव मंडळ आपणा सर्वांना मानव अधिकार सरंक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव वतीने कळकळीची नम्र विनंती की, सर्वत्र सध्या पाऊस चांगल्या प्रमाणात पडत असल्याने गणपती बप्पाचा सभामंडप पाऊसाने ओले झालेले असल्याने गणपती बाप्पासाठी विद्युत पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठा लाईन पाऊसा पासून कशी सुरक्षित राहील यांची आपण सर्वांनी काळजी घ्यावी जेणे करून कुठं शॉट सर्किट होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी.तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लहान मुलांची सुद्धा आपण काळजी घ्यावी अशी नम्र सूचना मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांनी केली आहे.