डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य काैतुकास्पद - पाेलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील
दाैंड- डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा,ता.अलिबाग,जिल्हा रायगड यांचे वतीने दाैंड तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुक प्रसंगी माेठ्या प्रमाणावर निर्माल्य संकलन करुन त्यापासून कंपाेष्ट खतनिर्मिती करण्यात आली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे दाैंड,केडगाव व श्रीगाेंदा या ठिकाणचे सुमारे ७५ श्रीसदस्यांनी गुरुवार दिनांक २८ राेजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दाैंड येथील भीमानदीच्या परिसरात गणपती विसर्जन घाटाच्या परिसरात सुमारे ५ टन निर्माल्याचे संकलन करुन त्याची विभागणी प्लास्टिक वेगळे तर हार,फुले,फळे,व अन्य काही निर्माल्य वेगळे करुन ते तीन ट्रॅक्टर,एक घंटागाडी यांच्या सहाय्याने वाहतूक करुन दाैंड येथील एका शेतात खड्डा खोदून त्या खडयात त्याची कंपाेष्ट खत निर्मिती करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून ते खत तयार झाल्यानंतर ते परिसरातील शेतक-यांच्या शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एकंदरीत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या निर्माल्य संकल्पनेचे दाैंड नगरपरिषद,दाैंड पाेलीस स्टेशन,व सर्वच गणेश मंडळांच्या व गणेश भक्तांच्या वतीने काैतुक करुन समाधान व्यक्त करण्यात आले.