आजी माजी सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी वतीने संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस साजरा
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून आपली ओळख असणारे श्री सोमेश्वर साखर कारखाना विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस आजी माजी सैनिक संघटना तालुका बारामती,सोमेश्वरनगर व सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी सोमेश्वर नगर यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,कायदेशीर सल्लागार अँड.गणेश आळंदीकर,ज्येष्ठ राजाराम शेंडकर कार्याध्यक्ष नितीन शेंडकर सह इतर मान्यवर उपस्थित होते.