Type Here to Get Search Results !

गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी 'सोमेश्वर' बाजारपेठ फुलली

गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी 'सोमेश्वर' बाजारपेठ फुलली
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील  सोमेश्वरनगर येथील मुख्य बाजरपेठ परीसरात मंगळवार दि १९ रोजी श्रीगणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे .. करंजेपूल येथील सोमेश्वरनगर बाजारपेठ ही काही दिवसांपूर्वी शांतता व शुकशुकाट होता पण आज  आज सोमवार दि १८ रोजी सकाळपासूनच  सोमेश्वरनगर परिसरात  बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत आहे ,मूर्ती खरेदी करण्यासठी वाघळवाडी, करंजेपूल,करंजे, मगरवाडी, सोरटेवाडी,देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, करंजेपूल येथील सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी  येत असतात  .

दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण ज्यास्तीचे असल्याने सोमेश्वरनगर येथील करंजेपुल बाजारपेठ मोठ्या संख्येने गजबाजली  आहे .

     या मूर्त्यांमध्ये लालबागचाराजा ,दगडूशेठ व विविध आसनावर ती बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची घरगुती साठी  मागणी बाजारपेठेत दिसत आहे .डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची वड या मूर्ती खरेदी करण्याकडे आहे .या सर्व श्रीगणेशाच्या मूर्त्या पाचशे रुपयांपासून ते सहा हजार हजारापर्यंत बाजारपेठेमध्ये उपलब्ध असल्याची माहिती करंजेतील व्यापारी संजय कुंभार यांनी  दिली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test