करंजे वि का सह (विकास) सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन पदी मच्छिंद्र प्रल्हाद शेंडकर यांची बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील करंजे विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी मच्छिंद्र प्रल्हाद शेंडकर यांची शुक्रवार दि २२ रोजी बिनविरोध निवड झाली..प्रसंगी अगोदरचे व्हाईस चेअरमन महेंद्र विठ्ठल शेंडकर यांनी ठरलेल्या वेळात राजीनामा दिल्याने व एकमेव मच्छिंद्र प्रल्हाद शेंडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करंजे सोसायटीचे चेअरमन कृणाल कांतीलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी अमर गायकवाड यांनी व्हाईस चेअरमन महेंद्र शेंडकर हे नाव घोषित केली सहकार्य संस्थेचे सचिव दीपक शिर्के यांचे लाभले याप्रसंगी करंजे पतसंस्था चेअरमन निवृत्ती (बिंटू अण्णा) शेंडकर, संचालक नामदेव शेंडकर, माजी चेअरमन अनिल गायकवाड ,माजी व्हाईस चेअरमन हनुमंत शेंडकर ,माजी संचालक प्रल्हाद गायकवाड ,करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड,अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर,किरण शेंडकर, श्रीकांत शेंडकर सह सर्व संचालक कर्मचारी वृंद उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित मच्छिंद्र शेंडकर म्हणाले की संस्थेचा पारदर्शक कारभार ,सभासदांना न्याय आणि संस्था वाढीसाठी तत्पर राहील असे ते म्हणाले सर्वच उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल मच्छिंद्र शेंडकर यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देत अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.