सिद्धार्थनगर व अनंतनगर आमराई येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाण्याची टाकीसाठी निवेदन.
बारामती - सिद्धार्थनगर व अनंतनगर आमराई येथील पाण्याच्या बोअरला दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बसविण्याची मागणी भारतीय युवा पँथर संघटना बारामती शहर कार्याध्यक्ष नितीन अरुण गायकवाड यांनी मा.मुख्याधिकारी बारामती नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन मा.जय दादा पाटील बारामती शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना देखील दिले आहे.
या वेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे , संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष असलम शेख ,शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात, शहर संघटक समीर खान,सामाजिक कार्यकर्ते योगेश महाडिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.