सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती विषयक निसर्ग गणेश कार्यशाळा संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती पर निसर्ग गणेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सव हा संपूर्ण भारतीयांच्या भक्तीचे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, परंतु गणेशोत्सवाला आलेले रंजक स्वरूप मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषणाला चालना देते म्हणून गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेस एकूण २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजी. आणि टेक्नॉलॉजी कॉलेज चे प्रा.दिनेश काटे व प्रा. चिन्मय नाईक हे लाभले होते. यामध्ये प्रा.चिन्मय नाईक यांनी गणेशोत्सवातील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. प्रा दिनेश काटे यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणपती तयार कसा करायचा याचे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांना दिले. यावेळेस द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. भूमिका जायपत्रे हिने ही उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारली.
कार्यशाळेचे प्रस्ताविक व आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश निकाळजे यांनी केले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.धनंजय बनसोडे यांनी पर्यावरण समतोल राखणे गरजेचे आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रा संपतराव सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंग वापरून बनवलेल्या गणेश मूर्तींमुळे जलजीवसृष्टीला हानी पोहचते असे मत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनिता घाडगे व आभार जयश्री भोसले यांनी केले.
यावेळेस प्रा अतिश यादव प्रा.अजित जगताप,प्रा. शुभम ठोंबरे, प्रा समृद्धी पवार ,अमित काकडे , संदीप जगदाळे व रा. से.यो सदस्य , प्राध्यापक प्राध्याकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.