'हर हर महादेव' च्या गजरात करंजेतील "सोमेश्वर"ची यात्रा संपन्न.
सोमेश्वरनगर - श्रावण महिन्यातील चौथा सोमवार प्रसिद्ध सोरटी सोमनाथचे रुप मानले जाणारे बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर सोमेश्वर शिवलिंग दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा सुरू झाल्या होत्या. शेवटचा सोमवार (दि ११ रोजी) असल्याने यावेळी देवाची महापूजा चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बारामती उपअधीक्षक गणेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती अध्यक्ष संभाजी होळकर ,राजेंद्रराव काकडे व सौ मंदाकिनी राजेंद्र काकडे , अर्बन बँक चेअरमन बारामती सचिन सातव व त्यांची पत्नी या मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान वाजत गाजत करंजे व आंबवडे ता. खटाव तसेच को-हाळे येथील खोमणे परिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या तर्फे पालखीची विधिवत पूजा मानसन्मान करण्यात आले. करंजेतील ननावरे कुटुंबाच्या वतीने पालखी सोहळ्यास पायघड्यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच पालखी भेट कार्यक्रम होत श्रींची पुज्या वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी करंजे ग्रामस्थांनसह बारामती व विविध जिल्ह्यातुन आलेले भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला व मंदिर परिसरात पालखी व श्रींचे आरती होत श्रावण नी सोमवारच्या यत्राची सांगता झाली.
मंदिर परिसर विविध दुकाने,मिठाई,गृहउपयोगी वस्तू, पाळणे तसेच हॉटेल व्यावसाईक ने गजबजून गेला होता.प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी बारामती एस टी महामंडळ तर्फे सोमेश्वर दर्शन यात्रा स्पेशल एसटी बसेस ची सोय करण्यात आली होती.
दुपारचा महाप्रसाद सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे ठेवण्यात आला होता व संध्याकाळचा महाप्रसाद प्रमोद कुमार गीते व नामदेव अण्णा शिंगटे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते.
यात्रा काळात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक शेलार यांच्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शेवटचा सोमवार असल्याने दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले होते. शेवटच्या सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले.
असल्याची माहिती सोमेश्वर मंदिर देवस्थानने दिली.
......
आलेल्या सर्व शिवभक्तांनी यात्रा काळात कायदा सुव्यवस्था चे पालन केले व यात्रा काळात कोणतेही दुर्घटना न होता पार पडली त्यामुळे सर्व शिवभक्त ,ग्रामस्थ यांचे आभार
वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे