सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विक्रमांना गवसणी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी शौर्य शाम गायकवाड याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अनोखा विक्रम नोंदवला शौर्याने २.९४ सेकंदात A to Z अल्फाबेट्स वेगाने टाईप करत हा विक्रम पूर्ण केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.
तसेच इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कृतिका विनोद घाटे हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसर येथे झालेल्या क्लारा ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये तायक्वांदो या प्रकारात एका मिनिटात १७२ कीक मारून जागतिक विक्रम नोंदवला. याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी झाली. या स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी कृतिका व शौर्य यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.