महत्वाची सूचना ! वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत जातीय सलोखा राखत ....नियम अटींचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा- API सचिन काळे
सोमेश्वरनगर - वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळ पदाधिकारी यांची बैठक शुक्रवार दि.१५ रोजी घेण्यात आली त्यामध्ये प्रत्येक मंडळाने पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे याबाबत सूचना केली,देखावे कोणते लावणार तसेच बॅनर कोणते लावणार याबाबत आगाऊ माहिती केलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकणेबाबत व त्याबाबत आगाऊ परवानगी घेणेबाबत सांगण्यात आले, गणपतीसाठी तयार करण्यात आलेले स्टेज हे मजबूत असावे,गणपती समोर सीसीटीव्ही कार्यरत असावे त्याचप्रमाणे दिवसा व रात्री दोन स्वयंसेवक गणपती देखरेख साठी आपल्याकडून कार्यरत ठेवावेत,कोणीही गणपतीचे मंडपामध्ये अगर पाठीमागे जुगार खेळणार नाही अगर दारू पिणार नाही याबाबत दक्षता पदाधिकारी घेतील ,वर्गणी साठी कोणावरही दबाव अगर जबरदस्ती करू नये,सामाजिक सलोख्याचे काम व ऐक्याचे काम आपल्या मंडळाकडून या उत्सव काळात व्हावे याबाबत सूचना केल्या, तसेच कोणीही डीजे लावणार नाही याबाबत सूचना केल्या विवादित बॅनर अथवा देखावे कोणी लावणार नाही कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे याबाबत सूचना
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी उपस्थित गणेश मंडळांना केल्या.