स्तुत्य उपक्रम ! सोमेश्वर विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
शिष्यवृत्ती परीक्षासाठी(इ.५वी.इ.८वी) मार्गदर्शक ६० पुस्तकांचा संच भेट
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर येथील एस.एस.सी १९९० बॅच च्या वतीने माजी विद्यार्थ्यांनी गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत ५१ गणवेश व शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी.इ.८वी) मार्गदर्शक ६० पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच सुभेदार कांबळे यांनी गरजू व गरीब शालेय ११ विद्यार्थ्यांना गणवेश दिले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अभिजीत केंजळे (संगणक तज्ञ कॅनडा), सुनील घाडगे (केंद्र समन्वयक प्राथमिक शाळा सोमेश्वरनगर), दादासाहेब गायकवाड (एस.टी. महामंडळात कार्यरत) तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य पी. बी. जगताप, पर्यवेक्षक सौ.विजया शिर्के , गणवेश वाटप नियोजन विजय शिंदे तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र झुरंगे व आभार अंकुश डोंबाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.