संपादक पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद - पोलीस निरिक्षक दिनेश तायडे
हृदयरोग तपासणी शिबिरात ५९ पत्रकार बांधवांची तपासणी
बारामती प्रतिनिधी - माणसांची मानसिकता अशी झाली आहे की जेव्हा गाडी बंद पडेल तेव्हाच गँरेजला घेऊन जातो.जर रेगुलर चेक अप केल तर बाँडी कमी डॅमेज होते असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांनी केले.
संपादक पत्रकार संघ आयोजित योध्दा प्रोडक्शन व पब्लिसिटी च्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामतीतील पत्रकार बांधवासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर रुबी हाॅल क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी तायडे बोलत होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डाॅ.ऋतुराज काळे विशाल जाधव अॅड शिवकांत वाघमोडे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तायडे म्हणाले संपादक पत्रकार संघाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे.कामाच्या धावपळीत आपण शरीराकडे लक्ष देत नाही त्यामुळे मोठ काय तरी होते त्यापेक्षा वेळेवरच शरीराकडे बघितल पाहीजे असे तायडे यांनी सागितले.
यावेळी ऋतुराज काळे यांनी पत्रकार बांधव ब्रेकिंग न्यूज च्या धावपळीत स्वःताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात त्यामुळे हे शिबिर घेऊन एक चांगला कार्यक्रम हाती घेतला असुन या माध्यमातुन पत्रकार आपल्या शरीरावर लक्ष देतील असे म्हणत शुभेच्छा दिल्या.
विशाल जाधव म्हणाले संपादक पत्रकार संघाचे कार्यक्रम दरवर्षी कौतुकास्पद असतात तसेच अन्याय विरुध्द लढा देण्याचे काम पत्रकार कडुन केले जाते.
या शिबिरासाठी रुबी हॉल क्लिनिक डॉ. कार्तिक जाधव, संदिप अनाद , महेंद्र कांबळे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पुणे ,श्रीनिवास शेलार व्यवस्थापक रूबी हॉल बारामती तुषार सोनवणे,राहुल चांदगुडे,प्रमोद कावळे यांचे सहकार्य लाभले.सदर शिबिर मध्ये एकुण ५९ पत्रकार यांनी सहभाग नोंदवुन तपासणी करुन घेतली.सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संपादक पत्रकार संघाचे पदाधिकारी व सभासद वर्गाने परिश्रम घेतले सुत्रसंचालन नाना साळवे यांनी केले.