"माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ"च्या महिला आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी भाग्यश्री नानासाहेब भोळे यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर ,करंजेपुल येथील भाग्यश्री नानासाहेब भोळे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या महिला आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या सूचनेनुसार संस्थेच्या पत्रकार द्वारे जाहीर केली आहे. सदर नियुक्ती ही दिनांक ११/०८/२०२३ पासून पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येई पर्यंत लागू राहिल. सदर आपणास दिलेले पद हे मानद स्वरूपांचे असून आपणांस भारतीय संविधान, भारतीय कायदे, व आपल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करावयाचे आहे.आपण सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा. तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण पदांचा जबाबदारीने वापर करावा.
निवडीनंतर भाग्यश्री भोळे बोलताना म्हणाल्या की महिलांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात लढण्यासाठी मी माझ्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वतीने न्याय देण्याच्या भूमिकेतून नेहमीच तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच झालेल्या निवडीबद्दल भोळे यांचे परिसरातील महिला वर्गाकडुन विशेष अभिनंदन होतआहे.