वडगाव निंबाळकर येथील नागेश जाधव यांची
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे-उपजिल्हा कक्षप्रमुख पदी निवड
सोमेश्वरनगर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे-उपजिल्हा कक्षप्रमुख या पदासाठी नागेश कालिदास जाधव यांची निवड करण्यात आली.
दिनांक ३ रोजी ठाणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (महाराष्ट्र राज्य) कक्षप्रमुख, रामहरी भीमराव राऊत तसेच सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक धनंजय ओंबासे महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य तसेच प्रतीक गोसावी सचिव महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटना हे उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून आपण गोर गरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात १०%+१०% राखीव जागा उपलब्ध करून देण्यासाठी निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजूंना शस्त्रक्रिया मोफत करणे यासाठी मी सदैव तत्पर असेन तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री अष्टविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असे हि नागेश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.