कृषी उपसंचालक(वर्ग-१)अधिकारी या पदाला गवसणी घालणारे सोमेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आशिष बालगुडे यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात चमकले आहेत ... त्यामध्ये आणखी एक भर घालणारे मुर्टि येथील आशिष बाळासाहेब बालगुडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमधून कृषी उपसंचालक(वर्ग-१)अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे ....सातत्यपूर्ण सखोल अभ्यास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. हा विश्वास खरा करू दाखवण्यासाठी व आई-वडिलांचे, शिक्षकांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून हे उज्वल यश मिळाले. असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमधून कृषी उपसंचालक(वर्ग-१)अधिकारी या पदाला गवसणी घालणारे सोमेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आशिष बाळासाहेब बालगुडे यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर या प्रशालेच्या वतीने "अलौकिक यशप्राप्ती" महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेचे विजेते माजी विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम रामराजे जगताप यांच्या हस्ते चि. आशिष बालगुडे (कृषी उपसंचालक, महाराष्ट्र राज्य) कु. सुवर्णा निंबाळकर (टेक्निकल असिस्टंट, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर) चि. ज्ञानेश्वर मदने (मंत्रालय सहाय्यक) या तीन प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच
संस्कृत दिन व नारळी पौर्णिमा"रक्षाबंधन" हा सण प्रशालेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी संस्कृत दिन व नारळी पौर्णिमा "रक्षाबंधन" या विषयावर आपली मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा मा. सौ. प्रणिताताई खोमणे, निवृत्त कार्यालयीन अधीक्षक संभाजीराव काकडे, प्रशालेचे प्राचार्य प्रमोद जगताप पर्यवेक्षक सौ. शिर्के मॅडम सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. राणी शेंडकर ,आभार राजेंद्र नलवडे व सूत्रसंचालन.राजेंद्र झुरंगे. सौ खोमणे मॅडम व अंकुश डोंबाळे यांनी केले.