बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मूरुम मधील जय मल्हार कुस्ती केंद्राचे यश
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील मुरूम येथील साळोबावस्ती नजिक जय मल्हार कुस्ती केंद्रातील १४ वर्षे १७वर्ष १९ वर्षे वयोगटात यश संपादन केलेल्या कुस्तीगिरांचे सत्कार करण्यात आला.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे १) आयुष तानाजी भंडलकर २) समर्थ उमाजी भंडलकर ३) कौस्तुभ सोमनाथ भंडलकर ४) संजय संजय शिंदे ५) सचिन आटोळे ६) शिवराज जयकुमार भोसले ७) शेखर सोमनाथ भंडलकर ८) धनराज निलेश मदने ९) शंभुराजे साळुंखे१०) वीरेन रमेश साळुंखे. याप्रसंगी वानेवाडी नेम इंग्लिश स्कूल चे शारीरिक शिक्षण संचालक अशोक भोसले सर, मु.सा काकडे महाविद्यालयाचे प्रा. दत्तराज जगताप सर, बारामती दूध संघाचे माजी संचालक कौस्तुभ भैया चव्हाण सर्व कुस्तीगिरांना मार्गदर्शन करणारे सौरभ जाधव, मल्हारी भंडलकर बच्चन आटोळे, याप्रसंगी महाराष्ट्र जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंडलकर, दत्तात्रय भंडलकर भाऊसाहेब भंडलकर अंकुश भंडलकर नंदकुमार भंडलकर लखन भंडलकर उपस्थित होते.
प्रास्ताविक व आभार कौस्तुभैया चव्हाण यांनी केले.