सोमेश्वरचा सन २०२२-२३ चा उसाचा उच्चांकी अंतिम उस दर राज्याला दिशाभुल करणारा डंका- सतिशराव काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या कारखान्याने सन २०२२-२३ याआर्थिक वर्षांत गाळप झालेल्या उसाला राज्यात ३ हजार ३५०/- रु. प्रति मे. टन उच्चांकी दर दिला असल्याचा डंका केलेला आहे. वास्तविक सोमेश्वरच्या सभासदांना ३ हजार ५५०/- रू. प्रति मे.टन अंतिम भाव बसत असताना जाणीव पुर्वक २००/- रू. प्रति मे.टन कमी दर देवून चेअरमन व संचालक मंडळाने सभासदांच्या तोंडाला पाने पुसून सर्व सभासदांची दिशाभुल केलेली आहे. दुसरीकडे मात्र
चेअरमन व संचालक मंडळ गावोगावी उच्चांकी दर दिला म्हणुन हार तुरे स्विकारून फार मोठी
कामगीरी केल्याचे भासवत आहेत. त्याचा शेतकरी कृती समिती जाहिर निषेध करते.
वास्तविक गतवर्षी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सोमेश्वर कारखान्याने परिसरातील इतर
कारखान्यांपेक्षा जादा गाळप क्षमतेने उसाचे गाळप केलेले असल्याने तसेच रिकव्हरी जादा असल्याने
साखरेचे, को-जन, उपपदार्थांचे जादा उत्पादन मिळालेले आहे. गत वर्षी कारखान्यास निर्यात साखरेला उच्चांकी ४०००/- रू. क्विंटलचे वर दर मिळालेले आहेत, कारखान्याचा सरासरी साखर विक्री दर ३ हजार ३२५/- रू. क्विंटल मिळालेला आहे. तसेच डिस्टीलरी व को-जन प्रकल्पांमधुनही अंदाजे ५० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. असे असताना सोमेश्वर कारखान्याने आर्थिक पत्रकात १५ कोटी ठेव विमोचन निधी कपात करून व डिस्टीलरी उपपदार्थांचे मुल्यांकन कमी करून अंतिम उस दर २००/- रू. प्रति मे. टनाने कमी केलेला आहे. त्यामुळे सभासदांना अधिकचा दर मिळणे कमः प्रात्प असतानाही चेअरमन व संचालक मंडळाने २००/- रू. प्रति मे. टन कमी दर देवुनही उसाला राज्यात उच्चांकी दर दिल्याची बतावणी करून सभासदांची व राज्यातील जनतेची दिशाभुल करण्याचे काम करत आहेत.
राज्यामध्ये अनेक कारखान्यांची FRP रक्कम ३ हजार २०० ते ३ हजार ३०० रू. प्रति मे. टन आहे. तसेच शेजारी माळेगाव कारखान्याने अद्याप पर्यंत उसाचा अंतिम दर जाहिर केलेला नाही. परंतु निश्चितच तो दर सोमेश्वर कारखान्याच्या उस दरापेक्षा जादा असेल असे वाटते. मग सोमेश्वर कारखान्याने जादा गाळप केलेले असताना, कारखान्याची रिकव्हरी जादा असताना सरासरी साखर विक्री दर जादा असताना, माळेगाव कारखान्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याचा पगारावरील खर्च कमी असल्याने सोमेश्वरचा कारखान्याचा माळेगाव कारखान्यापेक्षा जादा अंतिम उस दर बसत आहे. परंतु सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने १५ कोटी रूपये ठेव विमोचन निधी (की रक्कमेला व्याज नाही )कपात करून सभासदांच्यावर अन्याय केलेला आहे. वास्तविक हा ठेव विमोचन निधी कपात करण्याचे काही कारण नाही. चेअरमन व संचालक मंडळाने सन २०१७-१८ साली अशाच पध्दतीने भविष्यात उस दर देण्यासाठी पैसे कमी पडले तर उस दर देण्यासाठी सुमारे २० कोटी रूपयांचा किंमत चढउतार निधी कपात करून ठेवलेला होता. त्याचा विनियोग फक्त न फक्त सभासदांना अधिकचा दर देण्यासाठीच करावयाचा होता. परंतु कारखान्याने २८/२/२०२२ रोजीच्या ऑनलाईन मिटींग मध्ये तो निधी विस्तारवाढीच्या नावाखाली वर्ग करण्यात आला. (ऑनलाईन मिटींग होत असताना चेअरमन यांच्याकडेच कोणाला बोलुन द्यायचे व कोणाला बोलुन नाही यायचे याचे बटन असल्याने त्यांनी त्यांच्याच पार्टीच्या लोकांना बोलण्यास देवुन सदर निधी वर्ग करण्याचा ठराव करून घेतलेला आहे.) यावरून चेअरमन यांचा सभासदां विषयी असणारा कळवळा दिसतो. या वर्षीच्या उस बिलातून कपात केलेला १५ कोटी रूपयांचा ठेव विमोचन निधीही स्वतःच्या स्वार्थासाठी बांधकामे काढुन व अनावश्यक
खर्च करून होणार आहे असे वाटते? त्यामुळे जागरूक सभासदांनी संचालक मंडळाच्या भुलथापांना बळी न पडता घामाचे दाम घेण्यासाठी संचालक मंडळाला वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारावा असे कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने नफ्यातुन काढुन ठेवलेले १५ कोटी रूपये सभासदांनाच उस दर वाढवुन देण्यासाठी खर्ची टाकावेत! अन्यथा गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील लाखो मे.टन उस बाहेरील कारखान्यास गाळपासाठी गेल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे चेअरमन व संचालक मंडळाने नफ्यातुन काढुन ठेवलेल्या १५ कोटी रूपयांबाबत फेरविचार करून सदर रक्कम सभासदांना वाढवुन दयावी. कारखाना अंतिम उस दरा मधुन २०/- रु. प्रति मेटन कपात करणार आहे. असे कळते परंतु कारखान्याने आगोदरच सभासदांच्या खिशातुन १५ कोटी रूपये ठेव विमोचन निधी म्हणुन कपात करून घेतलेले असताना ही २०/- रू. प्रति मे. टन कपात करणार आहेत म्हणजे कारखाना सभासदांकडुन १५ कोटी रुपयांप्रमाणे १००/- रु. प्रति मे.टन व २० रू. प्रति मे.टन असे एकुण १२०/- रु. कपात करणार आहेत म्हणजेच कारखाना दोन्ही बाजुंनी कपाती करून सभासदांची फसवणुक करत आहे.
सतिशराव शिवाजीराव काकडे
अध्यक्ष, शेतकरी कृती समिती सोमेश्वरनगर