Type Here to Get Search Results !

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी खाजगी वाहनासाठी नवीन मालिका सुरु

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी खाजगी वाहनासाठी नवीन मालिका सुरु 
बारामती (दिगंबर पडकर)
 
बारामती उपप्रादेशिक परिवहन  या कार्यालयात दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी दुचाकी खाजगी वाहनासाठी नवीन मालिका MH 42 BL सुरु करण्यात येत आहे.
                                
मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30  ते दुपारी 02.30 या  दरम्यान अर्ज व शुल्क रकमेच्या डी.डी. सह जमा करावा. अर्ज नमुना व आवश्यक क्रमांकासाठी भरावे लागणारे शुल्काची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देणेत येईल.
                                 
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 मध्ये विहीत केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. ( उदा.लाईटबील,टेलीफोन बील इ.) तसेच अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र (उदा.आधार कार्ड /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र /पासपोर्ट/ पॅन कार्ड इ.) ची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.


दि. २८/०८/२०२३ रोजी स्विकरण्यात आलेल्या चार चाकी खाजगी संवर्गातील (LMV NT) एकाच नंबर करीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक २८/०८/२०२३ रोजी दुपारी ४.०० पर्यंत कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लीलाव पध्दतीने वाटप केले जाईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक २९/०८/२०२३ हया दिवशी दुपारी ०३.३० वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फीच्या डीडी व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डीडी एका लखोट्यात स्वतः जमा करावा. सदर डीडी 'Dy.R.T.O. Baramati' यांच्या नांवे नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बँक (शेड्युल्ड बँकेचा डीडी बारामती येथील असावा). त्यासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. दिनांक २९/०८/२०२३ दिवशी दुपारी ०४.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दोष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमुद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

चार चाकी खाजगी संवर्गातील (LMV NT) तिप्पट रक्कमेच्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर दि. ३०/०८/२०२३ रोजी दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनाकरिता उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहीत शुल्काच्या डीडी सह अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी ०२.३० या दरम्यान स्विकारण्यात जातील.दि. ३०/०८/२०२३ रोजी दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनाकरिता उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता स्विकरण्यात आलेल्या एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक ३१/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० पर्यंत कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लीलाव पध्दतीने वाटप केले जाईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक ०१/०९/२०२३ या दिवशी दुपारी ३.३० वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फी च्या डीडी व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डीडी एका लखोट्यात स्वतः जमा करावा. सदर डीडी Dy.R.T.O.. Baramati' यांच्या नांये नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बैंक (शेड्युल्ड बँकेचा डीडी बारामती येथील असावा). त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची / आधार कार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. दिनांक ०१/०९/२०२३ दिवशी दुपारी ०४.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तींसमोर (संबंधीत अर्जदार) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिदष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमुद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. एकदा आरक्षित ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. आरक्षित ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test