सोमेश्वरनगर ! शिक्षणाने माणूस विवेकी, विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे - डाॅ. मनोहर जाधव
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालालजी काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.दि. ३१ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 'स्वायत्त महाविद्यालय : संधी आणि आव्हाने ' या विषयावर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. चे प्राचार्य डाॅ. अविनाश जगताप यांनी विचार मांडले. स्वायत्त महाविद्यालयांना स्थानिक रोजगाराच्या संधी विचारात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना अनेक आव्हाने असली तरी विद्यार्थी हितासाठी सर्वांनी सकारात्मक राहिले तर त्यातूनही आपणांस आनंद मिळू शकतो अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. संजय घाडगे हे होते. त्यांनी कै . बाबांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणार असून सर्वांनी त्याकडे स्वागतार्ह भूमिकेतून पाहावे असे आवाहन त्यांनी केले. श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. त्यामध्ये कै.बाबांची दानशूर वृत्ती, त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. तर डाॅ. श्रीकांत घाडगे यांनी आभार मानले.
दि. ०१ रोजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी 'स्री-पुरुष समानता ' या विषयावर प्रा.डाॅ. सीमा नाईक-गोसावी यांनी व्याख्यान दिले. स्रीकडे अजूनही माणूस म्हणून पाहिले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे. स्रीला बाईपणाच्या जोखाडातून मुक्त करणे आणि तीही एक माणूस आहे , तिलाही मन , भावना , महत्त्वकांक्षा आहेत , केवळ ती स्री आहे म्हणून तिची संधी कुणीही हिरावून घेवू नये.याप्रसंगी श्री. संकेत जगताप यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. नारायण राजूरवार यांनी मानले
दि. ०४ / ०८ / २०२२ रोजी व्याख्यानमालेचा तिसरा दिवस या दिवशी ' शिक्षण, समाज ,साहित्य वगैरे ; आजचे वर्तमान ' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डाॅ. मनोहर जावध यांनी विचार मांडले. शिक्षणाने माणूस विवेकी व विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे . माणसांना विज्ञानाच्या सुविधा हव्या आहेत पण विज्ञाननिष्ठ विचार नको झालेत. शिकलेली माणसं जर जातीचे कळप करून राहणार असतील तर शिक्षण व्यर्थ आहे. असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. भीमराव बनसोडे होते. आभार डाॅ. संजू जाधव यांनी मानले. याप्रसंगी प्रा. सुजाता भोईटे , उपप्राचार्य डाॅ जगन्नाथ साळवे , डाॅ. जया कदम , प्रा. रवींद्र जगताप, जवाहर चौधरी सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, सेवक उपस्थित होते.