शासकीय कार्यालयांना कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन अद्ययावत करावे
पुणे : पुणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची १ जुलै २०२३ या अर्हता दिनांकावरील सेवा व वेतन विषयक माहिती https://mahades.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर ऑनलाइन अद्ययावत करण्याचे आवाहन, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने केले आहे.
कर्मचाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करण्याकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी संगणकीय आज्ञावलीचे युजरनेम व पासवर्ड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे यांचेकडून उपलब्ध करून घ्यावेत. माहिती अद्यावत करून त्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे यांचेकडून प्राप्त करुन घेऊन 'माहे नोव्हेंबर २०२३ देय डिसेंबर २०२३' या वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र 'माहे फेब्रुवारी २०२४ देय मार्च २०२४' च्या वेतन देयकासोबत जोडण आवश्यक आहे.
माहे नोव्हेंबर २०२३ व मार्च २०२४ चे प्रमाणपत्र वेतन देयकाशी जोडलेले नसल्यास कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयांनी पारित करण्यात येऊ नये, अशा सूचना अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिल्या असून सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही करावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, २५ शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडईसमोर, स्वामी समर्थ मठाशेजारी, पुणे-०२, दुरध्वनी क्रमांक ०२०-२४४५३२३६ व ई-मेल आय डी des.dsopune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सं. श्री. मरकळे यांनी केले आहे.