जेजुरीत महिला बचतगटाकडून मसाला उद्योग सुरू
जेजुरी - जेजुरी नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत जेजुरी शहरात प्रथमच जानुबाई महिला बचत गटाने मसाला गृह उद्योग सुरू केला असून या उद्योगाचा शुभारंभ जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक झा साहेब, प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बगाडे, बँक अधिकारी श्वेता सावंत, समुदाय संघटक अमर रणनवरे, योगेश शिंदे महिला बचत गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते जानुबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रुपाली म्हस्के आणि सचिव निर्मला शिंदे यांनी पुढाकार घेऊन सर्व महिला सदस्यांना बरोबर घेऊन बचत गटाची स्थापना करुन सर्व प्रकारचे मसाले व ग्रेव्ही बनविण्याच्या मशीन खरेदी करून व्यवसाय सुरू करुन महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग निर्माण केला आहे
जानुबाई महिला बचत गटाने घरगुती सर्व प्रकारचे मसाले व ग्रेव्ही बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला चांगल्याप्रकारे मार्केटिंग मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले