लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घ्यावा-टेकवडे
पुरंदर तालुका प्रमुख सिकंदर नदाफ
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतः ला झोकून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श तरुण वर्गाने घेतला पाहिजे असे मत पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील निरा येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे सामाजिक युवा मंचातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वा जयंती महोत्सव तसेच १०वी कक्षेसह १२ वी कक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणंवत विध्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात टेकवडे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांसह राष्ट्रपिता महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले आदी समाज सुधारक महापुरुषांच्या जीवन चारित्र्याचे तरुण वर्गाने अनुकरण करून समाजहितासाठी योगदान देणे तितकेच गरजेचे आहे.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, मार्तंड देव संस्थान विश्वस्त अनिल सौंदडे, तसेच पंडित मोडक दत्तात्रेय चव्हाण, संजय निगडे म्हस्कू शेंडगे उमेश चव्हाण सुनिल चव्हाण संदीप धायगुडे दादासाहेब गायकवाड सुनिल पाटोळे तसेच लहुजी वस्ताद साळवे सामाजिक युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतपाटोळे प्रताप भोसले सुरज खुडे विनोद पाटोळे आकाश कुचेकर हेमंत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.