"डिजिटल मीडिया एक संघ" या संघटनेचे चर्चा सत्र बैठक संपन्न.
बारामती - डिजिटल मीडिया एक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे चर्चा सत्र बैठक संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकती सोमेश्वरनगर येथे सोमवार दि ११ रोजी सकाळी संपन्न झाली.
यावेळी डिजिटल मीडिया एक संघ हा विविध उपक्रम राबवत काम करत आहे..तशी सर्वत्र ओळख ही निर्माण झाली आहे.... डिजिटल मीडियातील विविध माध्यमांना या संघातील पत्रकार सदस्य बांधव उत्तम पद्धतीने आपले काम करत असल्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी उपस्थित पत्रकार बांधवांचे कौतुक केले, आपल्या बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करावे यापुढे डिजिटल मीडिया एक संघ सदस्य संख्या झपाट्याने वाढत असून यामध्ये सर्वच पत्रकार बंधूंचे श्रेय आहे. संपन्न झालेल्या बैठकीदरम्यान पत्रकारांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम करत असताना आलेल्या अनेक समस्या तसेच बातमी संदर्भ विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्याचे निरसनही संस्थापक अध्यक्ष बनसोडे यांनी केले.
यावेळी बारामती तालुक्यातील मोठ्या संख्येने डिजिटल मीडिया एक संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.