संभाजी ब्रिगेडच्या कार्यतत्परतेने रविवार पेठेतील पाणीपुरवठा सुरळीत.
सातारा येथील प्रभाग क्र 15 मधील रविवार पेठ भागातील अचानक पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला पाणी पुरवठा वारंवार बंद होत असल्याने या समस्याचे निवारण करण्यासाठी या भागातील रहिवाशांनी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष यांना साद घातली. याची तातडीने दखल घेऊन संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष रफीकभाई शेख यांनी तातडीने सातारा नगरपालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकारींना यांना संपर्क केला व समस्याचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. या जिवनावश्यक मुलभूत सुविधांसाठी ची गैरसोय दुर होणे कामी वार्ड क्र 15 मध्ये समक्ष येऊन सर्वे करावा म्हणून बजावले असता सातारा पाणी पुरवठा विभागातील अधिकारींना दखल घेऊन तातडीने भेट देऊन पाहणी केली व सर्वे नंतर पाणी तुंबत असलेल्या भागात खोदकाम सुरू करून अतिपरिश्रमा नंतर पाईपलाईन ची स्वच्छता केली यावेळी चक्क रबरी बॉल आढळून आल्याने येथील नागरिक अचंबित झाले. नगरपालिका कर्मचारी वतीने सदर पाईप वाॅशआऊट करुन स्वच्छता करण्यात आली व याभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने समस्येचे निवारण झाले. संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष रफीकभाई शेख यांची जनहितासाठीची तळमळ व कार्यतत्परता यावेळी दिसुन आली. यावेळी येथील रहिवासी नागरिकांनी या कार्यतत्परतेची प्रसंशा करुन संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा अध्यक्ष रफीक शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता वाठारे व नगरपालिका कॉ ,सागर पवार,ठेकेदार सुदाम घाडगे यांचे आभार व्यक्त केले.