अनावश्यक खर्च टाळत ...त्या संचालकाने वाढदिवस केला साजरा ;सोमेश्वर परिसरातून कौतुक
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील माळवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करत नीरा मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक व करंजे गावचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला,ते नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा करत असतात त्यामुळे त्यांचे सोमेश्वर परिसरातून कौतुक होत आहे
याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते धनंजय गडदरे, सह शाळेतील शिक्षक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.