भारतीय पत्रकार संघ वतीने आशिष बालगुडे यांची कृषी उपसंचालक, महाराष्ट्र शासन (वर्ग-१) पदी निवडीबद्दल सत्कार.
सोमेश्वरनगर - मुर्टि येथील आशिष बाळासाहेब बालगुडे (MSC Agri) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत
अव्वल यश मिळवून कृषी उपसंचालक (Deputy Director) महाराष्ट्र शासन (वर्ग-१) पदी निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ वतीने बालगुडे यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे,पत्रकार शरद भगत,बाळासो बालगुडे ,बाळासाहेब वाबळे ,एम ए गायकवाड सह इतर मान्यवर उपस्थित होते.