बारामती ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने संगणक संचाचे वितरण
बारामती - आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने संगणक संचाचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने डिजिटल सेतू प्रकल्पाअंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालयासाठी ५० लाख रुपयांचे १२५ संगणक संचाचे वितरण करण्यात आले. आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने आरोग्य क्षेत्रासाठी बेड, वैद्यकीय उपकरणे, औषधी आदी बाबींसाठी नेहमीच मदत केली आहे, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
यावेळी माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सुपा ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती हिरवे, आयआय केअर फांऊडेशनच्या डिजिटल सेतू प्रकल्पाचे संचालक डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.