कै.वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा मेखळी,चोपडे वस्ती....
बारामती : हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांची माहिती देण्यासाठी मौजे मेखळी, चोपडे वस्ती येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळ व पीक पीक विमा योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य, पीएम किसान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी योजनांविषयी माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी सुभाष बोराटे यांनी पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी व आधार जोडणी करण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ श्री. संतोष कारंजे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी, लाल कोळी, मावा तुडतुडे या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली.
योवळी मेखळीचे सरपंच आनंद देवकाते यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.