करंजेतील "सोमेश्वर" शिवलिंग चे पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगाच रांगा
विविध जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा -अध्यक्ष प्रताप भांडवलकर
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र श्री स्वयंभू सोमेश्वर शिवलिंग हे सौराष्ट्रातील प्रतिसोरटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे आहेकरंजे येथे श्रावण महिन्यानिमित्त विविध जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात,श्रवणातील पहिला सोमवार असल्याने व नागपंचमी दिवसामुळे सोमेश्वर करंजे गावातील सोमेश्वर मंदिर येथे दुपारनंतर ना भाविकांची गर्दी वाढलेली होती ,सोमेश्वरमंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्यायेत. मंदिर परिसरात प्रशासनाकडून भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र चे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या सह पोलीस सहकाऱ्यांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे होळ प्राथमिक आरोग्य केंद्र व साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट डॉ राहुल शिंगटे व डॉ सचिन भिलर यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले आहे .
श्रावण यात्रा निमित्त मंदिर परिसर मिटाइवाले,खेळनी , गृहपयोगी वस्तू या दुकानांनी संपूर्ण परिसर गजवजला आहे तर मोठ मोठे पाळणे आल्याने भाविकांसाठी एक विशेष आकर्षण निर्माण झाले आहे,,तर यात्रेकरू याचा मनसोक्त आनंद घेत आहे.
देवस्थान मार्फत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पाणी, अन्नदान सोय करण्यात येत असते . श्रावणातील प्रत्येक सोमवारी सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी एस टी महामंडळाकडून यात्रा स्पेशल एस टी बसेस सोडण्यात आलेली आहेत.
सोमवार निमित्त भाविकांना दुपारची खिचडी वाटप विक्रम आप्पा भोसले, गणेशराव इंगळे, संदीप साळुंखे, यांच्यावतीने करण्यात आले.
तर संध्याकाळच्या महाप्रसाद चे आयोजन श्री सोमेश्वर सह कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्फत करण्यात आले.