लोणी भापकर (अविनाश बनसोडे) - बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील गेली वीस महीने गाव स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल येथील स्वच्छता अभियान ग्रुप ला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत लोणी भापकर च्या वतीने सरपंच गितांजली भापकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपसरपंच नंदकुमार मदने, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र (काका) भापकर, स्वाती बनसोडे, सोनाली पवार, श्रीकांत भापकर, ग्रामविकास अधिकारी उज्वला शिंगाडे तसेच स्वच्छता अभियान ग्रुप सर्व सदस्य, ग्रामस्थ ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडे लावून ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे.
असे स्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.