Type Here to Get Search Results !

करंजे येथे "स्वातंत्र्यदिन चषक" एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न."स्वातंत्र्यदिन चषक" वाघळवाडी संघाने पटकावला

करंजे येथे "स्वातंत्र्यदिन चषक" एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न.

"स्वातंत्र्यदिन चषक" वाघळवाडी संघाने पटकावला
सोमेश्वरनगर -करंजेगाव (ता बारामती) हे  क्रिकेट मैदानाचे हब बनले आहे.... बारामती तालुक्यातील अनेक क्रिकेट खेळाडू संघ येथे दर रविवारी  क्रिकेटच्या स्पर्धा भरवत असतात तसेच विविध तालुक्यातून स्पर्धक येत असतात तसेच दर वर्षी "सोमेश्वर करंडक" , " सोमेश्वर प्रीमियम लीग" नावे  करंजे येथील गलांडे मैदानावर मोठ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते ...या मैदानावर विविध जिल्ह्यातून संघ खेळत क्रिकेट खेळाचा आनंद घेत असतात  व क्रिकेट चे उत्कृष्ट मैदान तसेच योग्य आयोजन येथील आयोजक करत असतात त्यामुळे येणार प्रत्येक संघ आपले मत व्यक्त करत त्यांचे अभिनंदन करत असतात.
 मंगळवारी १५ ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनानिमित्त   एकदिवसीय" स्वातंत्र्यदिन चषक" क्रिकेट स्पर्धेचे   करंजे येथील गलांडे पाटील स्टेडियम येथे  आयोजन केले होते स्पर्धेचे उदघाटन सोमेश्वर पंचक्रोशीतील युवानेते नवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना संचालक संग्राम  सोरटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

या प्रसंगी करंजे माजी उपसरपंच  बुवासाहेब हुंबरे,प्रदिप शेंडकर , जितेंद्र सकुंडे उपस्थित होते तसेच साखळी पध्दतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत निरा,सोमेश्वरनगर, वडगाव निंबाळकर मुढाळे.परिसरातील सहा  संघांनी सहभाग नोंदवला होता , तसेच रंगतदार झालेल्या सामन्यांत प्रथम क्रमांक वाघळवाडी संघाने पटकवला, द्वितीय क्रमांक चोपडज संघ  तर तिसरा क्रमांक शेंडकर वाडी हे संघ विजेते ठरले स्पर्धेचे आयोजन किरण शेंडकर,भाऊसाहेब हुंबरे,पापा मुलाणी व राजेश भांडवलकर यांनी केले होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test