आजी माजी सैनिक संघटना ता बारामती सोमेश्वरनगर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटना ता बारामती सोमेश्वर येथील कार्यालय मध्ये मंगळवार दि १५ रोजी सकाळी स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्ट दिवस तिरंगा ध्वजारोहण श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे ,सोमेश्वर कारखाना संचालक शैलेश रासकर, तथास्तु हॉस्पिटल संचालक उज्वल पवार , भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आजी माजी सैनिक संघटना ही सोमेश्वर परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात चांगले काम करत आहे, कोरोना कालावधी तसेच दरडग्रस्तांना मदत मोठ्या प्रमाणात संघटनेमार्फत केल्याने त्याचे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कौतुक व आभार मानले ... सैनिकांविषयी असलेले वाद विवाद त्यांनी परस्पर मिटवण्याल्याने वडगांव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन व्यक्त केले व आपण सोबत चांगले काम करू अशी ही ग्वाही देण्यात आली.
तथास्तु हॉस्पिटल आयसीयू & मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल-वाघळवाडी मार्फत हॉस्पिटलचे डॉ चेअरमन डॉ सतीश चव्हाण यांच्या संकल्पनेतुन सैनिकांसाठी सवलत मध्ये काही टक्के विविध आजारांवर डिस्काउंट स्वरूप कार्ड वाटप सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या हस्ते माजी सैनिकांना वाटप करण्यात आले तसेच आरोग्य तपासणीही करण्यात आली ,नुकतीच पोलिस दलात भरती झालेल्या शेंडकरवाडीतील तेजस खेंगरे यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
उच्चांकी ऊस दर दिल्याबद्दल सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचाही सत्कार सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
या वेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, उपाध्यक्ष भगवान माळशिकारे कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, युवराज चव्हाण ,गणेश शेंडकर,बाळासाहेब गायकवाड, कोषाध्यक्ष किरण सोरटे ,सह कोषाध्यक्ष रवींद्र कोरडे,ज्येष्ठ मोहन शेंडकर, अशोक रासकर ,बाळासाहेब रासकर माणिक तावरे ,बबन डोपरे , पांडुरंग मांगडे सह सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे , वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन सह करंजेपुल दूरक्षेत्र पोलीस अधिकारी... सोमेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अँडो.गणेश आळंदीकर यांनी आजी-माजी सैनिक संघटनेचा आढावा देत प्रस्तावना केली, अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मानले.