"माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, नवी मुंबई" च्या बारामती तालुका उपाध्यक्ष पदी डॉ नानासाहेब भोळे यांची नियुक्ती
बारामती - माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या
उपाध्यक्ष, बारामती तालुका या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती ही दिनांक ११/०८/२०२३ पासून पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येई पर्यंत लागू राहिल. संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या सूचनेनुसार सदर आपणास दिलेले पद हे मानद स्वरूपांचे असून आपणांस भारतीय संविधान, भारतीय कायदे, व आपल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करावयाचे आहे. आपण सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा. तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण पदांचा जबाबदारीने वापर करावा.असे दिलेल्या निवडी पत्रकात म्हटले आहे.
डॉ नानासाहेब भोळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील मुलेगाव येथील रहिवासी असून ते सध्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजेपुल येथे स्थायिक आहेत... ते नेहमीच सामाजिक राजकीय कामात अग्रेसर असतात तशी त्यांची बारामती तालुक्यात ओळख निर्माण आहे तसेच ते आयुर्वेदिक डॉक्टर असून विविध आजारांवर उपचार ते खेडोपाडी तालुका शहर असे महाराष्ट्रभर भ्रमण करत नागरिकांना अल्प दरात सेवा देत असतात... त्याचबरोबर राजकीय सामाजिक पकड सुद्धा त्यांची भरगच्च असल्याने मूळ बीड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती जमाती यामध्ये त्यांनी दहा वर्ष पदावर चोख काम करत पार पडला तसेच त्यांच्या मूळगावी मुलेगाव ग्रामपंचायत मध्ये सलग 25 वर्ष सदस्य म्हणून काम केले आहे या अनुषंगाने त्यांच्या एकनिष्ठ कामाची व विविध क्षेत्रात त सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका याची दखल घेत नुकतीच माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या बारामती तालुका उपाध्यक्षपदी डॉ. नानासाहेब भोळे यांची निवड झाली आहे ...सदर निवडीबद्दल मुळगाव मुलेगाव तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन, कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■