पत्रकारवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय पत्रकार संघाच्या वतीने निवेदन
बारामती - जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये संदीप महाजन हे जखमी झाले असून "किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार" महाजन यांनी पोलिसात केली आहे.संदीप महाजन हे रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परत येत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला, विशेष म्हणजे नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो.
पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीचे निवेदन भारतीय पत्रकार संघ बारामती यांच्या वतीने शुक्रवार दि ११ रोजी वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्याकडे देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देताना भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे ,बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे ,उपाध्यक्ष शंतनु साळवे ,सचिव सुशीलकुमार अडागळे ,पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष निखिल नाटकर संघटक मोहम्मद शेख ,सोमनाथ लोणकर, सोमनाथ जाधव,आदि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने निवेदन देता प्रसंगी उपस्थित होते.
पत्रकार महाजन यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो व हा हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. पत्रकारांवर असा भ्याड हल्ला होत असेल तर सध्या महाराष्ट्र कोणत्या दिशेने मार्गक्रमन करतोय याचे सरकारने आत्मपरीक्षण करावे. पत्रकारांवर असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार
नाहीत.
निखिल नाटकर.
पत्रकार हल्लाकृती समिती प्रमुख, बारामती