Type Here to Get Search Results !

पुणे ! वैयक्तिक उद्योग अनुदानाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना कृषी विभागामार्फत तरतूद - पी टी काळे....गायगोठा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना जोड धंद्यावर व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न.

पुणे ! वैयक्तिक उद्योग अनुदानाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना कृषी विभागामार्फत तरतूद - पी टी काळे

गायगोठा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना जोड धंद्यावर व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न.
पुणे - गाय गोठा व  दूध उत्पादक शेतकऱ्यांना जोड धंद्यावर व्यवसाय मार्गदर्शन शिबिर कात्रज  डेअरी पुणे येथे ४ ऑगस्ट रोजी आयोजित केले होते.

या शिबिरात गाय गोठा उभारणी करता दोन कोटी अनुदान प्रकल्पाविषयी मार्गदर्शन मेळाव्यास शेतकऱ्यांचा व पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद , हॉलमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पार्किंग मध्ये सतरांज्यावर बसून मार्गदर्शन ऐकले.
    पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन भगवानराव पासलकर साहेब यांच्या सूचनेनुसार पी टी काळे यांचे गाय गोठा व  दूध उत्पादक शेतकऱ्यांना जोड धंद्यावर व्यवसाय मार्गदर्शन शिबिर कात्रज  डेअरी पुणे येथे आयोजित केले होते.
   शेतकऱ्यांसाठी जोडधंदा उभारणी करणे सोयीचं असल्याबाबत सांगून दूध प्रक्रिया उद्योग पशुखाद्य बनवण्यासाठी शासकीय योजनेतून ३५℅ {पस्तीस टक्के} अनुदानाची व कमाल मर्यादा वैयक्तिक उद्योगासाठी दहा लाख रुपये अनुदान तर गटातून उद्योग उभा केल्यास तीन कोटीपर्यंत अनुदानाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना कृषी विभागामार्फत तरतूद असल्याबाबत पी टी काळे त्यांनी सांगितले सध्या पी टी काळे कृषी विभागामध्ये प्रकल्प मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत तर व्यासपीठावरती दूध संघाचे संचालक गोपाळ अण्णा मस्के साहेब तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे  वाईस चेअरमन राहुल दिवेकर साहेब पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक कैलास गोपालघर पुणे जिल्हा दूध  संघाच्या माजी वाईस चेअरमन सौ गोपालघर मॅडम त्यांच्याबरोबर एचडीएफसी बँकेचे पुणे जिल्हा शेती विभागाचे प्रमुख सोमिया मॉल तसेच प्रदीप जगताप साहेब एरिया मॅनेजर श्रीनिवास साखरे साहेब एचडीएफसी बँकेचे फॅसिलीटर अजिंक्य काळे, एचडीएफसी बँकेच्या कात्रज शाखेच्या ब्रांच मॅनेजर  हारप्रीत मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते सदर मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक लिमये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार मारणे साहेब यांनी सूत्रसंचालन केले तर गोपालघर साहेब यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test