बारामती ! महसूल दिनी गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार;तालुक्यात महसूल सप्ताहला सुरुवात
बारामती : तालुका प्रशासनाच्यावतीने प्रशासकीय भवन येथे आयोजित महसूल दिनी गुणवंत कर्मचाऱ्यांना उपजिल्हाधिकारी हणमंत पाटील यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महसूल दिन कार्यक्रम आणि महसूल सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, स्वाती गायकवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी लक्ष्मण माने, तलाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कदम, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, कोतवाल आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, महसूल विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करत असताना तणावात राहून काम करण्यापेक्षा हसत खेळत काम केले पाहिजे. तसेच स्वत: बरोबर कुटूंबाची काळजी घ्यावी. महसूल दिनाच्या शुभेच्छा देत गुणवंत कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले.
तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा यासाठी बारामती उपविभागात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून ७ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लोकाभिमुख काम करुन नागरिकांना सेवा व योजनांचा लाभ देण्याचे काम करावे.
यावेळी तालुक्यातील पोटखराब असलेले क्षेत्र लागवड योग्य करुन लागवडीखाली आणलेल्या क्षेत्राचे सातबारा व फेरफार उताऱ्याचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.