Crime New ! माळेगाव येथे मटका अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ; तिघांवर गुन्हा.
मटका अड्ड्यावर छापा टाकून पिता-पुत्रासह ती
जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष भालचंद्र
निंबाळकर, दिलीप भुजंगराव शितोळे, अक्षय दिलीप शितोळे (सर्व रा. निंबाळकर वस्ती, माळेगाव
कारखाना, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल
झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कॉन्स्टेबल
विजय वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. माळेगाव
कारखाना परिसरातील निंबाळकर वस्तीवरील चिकन दुकानाच्या आडोशाला संतोष निंबाळकर, दिली शितोळे हे 'कल्याण' नावाचा मटका घेऊन अक्षय शितोळे याला देत होते. पोलिसांनी येथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५४० रुपये जप्त केले आहेत. पोलीस नाईक अमर थोरात
तपास करत आहेत.