Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! आजी माजी सैनिक संघटना वतीने "कारगिल विजयी दिवस" साजरा

सोमेश्वरनगर ! आजी माजी  सैनिक संघटना वतीने "कारगिल विजयी दिवस" साजरा

सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वर नगर तालुका बारामती यांच्या वतीने "कारगिल विजय दिवस" साजरा करण्यात आला तसेच  शहीद जवानांना श्रद्धांजली देत करंजेपुल मुख्य चौथे, वाघळवाडी सोमेश्वर कारखाना ते मुख्य चौक रॅली काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बारामती तालुक्यातील  चौधरवाडी, माळवाडी, वाकी, मोरगाव, सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वच आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर तसेच उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर ,कायदेशीर सल्लागार गणेश आळंदीकर यांच्या सह उपस्थित. सैनिकांनी करंजेपूल, सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज, काकडे कॉलेज, वाघळवाडी आश्रम शाळा,मु सा  काकडे महाविद्यालय, सोमेश्वर कारखाना येथे शिव
छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून रॅलीचे पुन्हा आगमन करंजेपूल येथे झाले. 
  आयोजित कार्यक्रम प्रसंगी  माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रूपचंद बापू शेंडकर, संचालक ऋषिकेश  गायकवाड, सिद्धीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव  सोरटे ,विवेकानंद अभ्यासिका चे गणेश सावंत, पत्रकार विनोद गोलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रस्ताविक सल्लागार ॲङ गणेश आळंदीकर यांनी केले. कारगिल विजय लढाईमध्ये सहभाग घेतलेले रासकर यांचे कारगिल लढाई मधील अविस्मरणीय क्षण त्यांनी सांगितले भाषण.
सोमेश्वरनगर परिसरातील गुणवंत जवानांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक तुकाराम सोरटे तसेच शंभूराजे तानाजीराव सोरटे यांचा देखील सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये सहभागी सर्व जवानांना वृक्षारोपणासाठी फळझाडांचे वाटप करण्यात आली. 
प्रस्ताविक सल्लागार ॲङ गणेश आळंदीकर यांनी केले तर आभार अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मानले.

 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. शहीद जवान अमर रहे या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test