बारामती ! तीन हजाराहून अधिक बारामतीकरांचा रोटरी फन झोन मध्ये उत्साहाने सहभाग
बारामती - रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या फन झोन मध्ये बारामतीच्या तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन आनंद लुटला आणि रोटरी क्लब ऑफ बारामतीला धन्यवाद देत रविवारची आपली सकाळ प्रसन्न केली.
रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात धडाकेबाज उपक्रमाने करण्यात आली. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हजेरी लावली. महेश रोकडे यांच्या हस्ते फन झोन मध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राहील झारी आणि अन्सार इनामदार यांनी बारामतीकरांना बासरीवादन आणि
सेकसोफोन याच्या वादनाने आनंदीत केले. कार्यक्रमांची सुरुवात स्कुल ऑफ योगा च्या विनय बनकर याच्या योगा सादरीकरणाने करण्यात आली.याप्रसंगी विनय बनकर यांनी झूम्बा नृत्य करून रोटरी फन झोन मध्ये सहभागी झालेल्या बारामतीकरांना उल्हासित केले. या फन झोन मध्ये रितेश देशमुख यांनी आर्चरी सादरीकरण केले. बारामतीतील युनूस डान्स अकॅडमीच्या युनूस युनूस इनामदार यांनी समूह नृत्य करून उपस्थितांना एक वेगळी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला.फन झोनमध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांना मातीकामाचे प्रात्यक्षिक आकाश कुंभार यांनी दाखविले तर चित्रात रंग भरण्याची कला फाल्गुनी अशोक देशपांडे,
रंजना अशोक तांबे,
रुपाली यशवंत तावरे आणि धों. आ. सातव विद्यालयातील
दीक्षित महेंद्र चंद्रकांत यांनी उपस्थितांना दाखवून लोकांच्या चेहऱ्यावरील रंग खुलविले.
वरद अशोक देशपांडे,
माहेश्वरी महेंद्र दीक्षित,
संग्राम किरण जगताप आणि
पवन अशोक देशपांडे यांनी कागदाच्या विविध गोष्टी बनवून दाखविल्या.मैदानी खेळांमध्ये कबड्डीची प्रत्यक्षिके दादासाहेब आव्हाड यांनी दाखविली तर निशांत बनकर यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब व जिमनस्टिक बद्दल बारामतीकरांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली.प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे आणि प्रा. डॉ. आबा कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजारम चतुरचंद महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादरीकरणातून समाज जागृतीचा केलेला प्रयत्न उपस्थिताची दाद घेऊन गेला.शरीराचा तोल सावरणे गरजेचे असते हे सांगणारे स्केटिंग एकता शहा आणि त्यांचा संघाने प्रात्यक्षिकातून दाखवून दिले त्याचवेळी दीपक मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कराटे प्रात्यक्षिके दाखविली.यावेळी इस्कॉन यांनी भजने सादर करून उपस्थितांना भक्तीरसाचा आनंद दिला.कार्यक्रमाचा समारोप विद्या प्रतिष्ठानच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील प्रा. सलीम बागवान यांच्या हास्य योगाने करण्यात आला.याबरोबरच रस्त्यावर कोडी - खेळ उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने लहान मुलांनी ती सोडविण्यासाठी आपली क्षमता तपासून पहिली.खेळ, ज्ञान,मनोरंजन, डान्स, व्यायाम,भक्ती,हास्य, याबरोबरच वैष्णवी डोसा, माऊली भेळ, कांबळे भजी, श्रीराम दाबेली, सैफी पथरिया, नेक्टकोस, माधुरी कनेहारिया आणि शिवानी यांनी फन झोन साठी आलेल्या लहान मुलापासून मोठया माणसांपर्यंत सगळ्यांची पोटाची भूक भागविली.
रोटरी फन झोन यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्ष रो. दर्शना गुजर, सचिव रो. अभिजित बर्गे, स्पोर्ट्स आणि कल्चर डायरेक्टर रो. सचिन चवरे, पब्लिक इमेज डायरेक्टर मल्लिकार्जुन हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी तर रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष आशिष अबड, सचिव यश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. रोटरी फन झोन आयोजनासाठी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामतीचे विभागीय पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी परवानगी दिली. बारामती नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी,आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वच्छता कर्मचारी जिल्हा क्रीडा संकुल बारामतीचे अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्ष रो.दर्शना गुजर यांनी केले तर उपस्थितांचे आभार रो. प्रा. डॉ अजय दरेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मामा जगताप यांनी केले.