स्तुत्यउपक्रम ... शेंडकरवाडी येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करत वाढदिवस केला साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील युवा कार्यकर्ता तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना माजी उपाध्यक्ष निखिल शेंडकर यांनी अनावश्यक खर्च टाळत सुभाषराव (दादा) शेंङकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेंडकर वाडीतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शाळा उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करत वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी प्रदिप तानाजीराव शेंङकर ,सचिन राजाराम शेंङकर व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर व उपस्थित गुरूजन वर्ग उपस्थित होते.