बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचा नियुक्ती सोहळा संपन्न
यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ मेटांगे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय कार्यकत्यांची संघटना तयार वीर बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही सामाजिक कार्यात सक्रीय असणारी संस्था मागील अनेक वर्षापासून अनेक सामाजिक प्रश्न सोडवत आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या संस्थेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ मेटांगे यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा या संस्थेचे पर्दापण झालेले आहे. त्याकरीता दि. १२/०७/२०२३ रोजी यवतमाळ येथील संघटनेचा नियुक्ती सोहळा संपन्न झाला. यामध्ये जिल्हाध्यक्ष
म्हणुन श्री. प्रमोदभाऊ मेटांगे, यवतमाळ जिल्हा उपजिल्हाध्यक्ष पदी श्री. किशोर वसंतराव इंगोले, महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. शुभांगीताई सुनिल जतकर,यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री. प्रल्हाद विठ्ठल धानोरकर, यवतमाळ जिल्हा सचिव पदी श्री. नितेश पांडुरंग चव्हाण, यवतमाळ शहर अध्यक्ष पदी सागर महादेव तुमसरे, यवतमाळ शहर उपाध्यक्ष पदी सुमित उमेशराव खराबे, घाटंजी
तालुका अध्यक्ष श्री. मोरेश्वर किसनराव मेश्राम, दारव्हा तालुका अध्यक्ष मयुर सुरेशराव झाडे, नेर तालुका अध्यक्ष सागर ज्ञानेश्वरराव उघडे यांची नियुक्ती करण्यात आली.