मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली वतीने ओंकार दत्तात्रय हेगडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.
कमी वयात हेगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी तर पुढील काळात मोठे यश संपादन करावे -अध्यक्ष नागेश जाधव
सोमेश्वरनगर प्रतिनिधी- बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील ओंकार दत्तात्रय हेगडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली , पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव तसेच कमिटीतील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हेगडे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हाअध्यक्ष नागेश जाधव , सचिव सोमेश हेगडे ,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष गोलांडे ,संघटक शिवाजीराव काकडे , भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका सचिव सुशीलकुमार अडागळे ,सोमेश्वरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ सह मान्यवर उपस्थित होते .
तसेच सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले ओंकार हेगडे बोलताना म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीतून आपले ध्येय निश्चिती करून यश साध्य करण्यासाठी कसे परिश्रम घेतले याबद्दल आपले मत व्यक्त केले .तसेच सातत्य व खाकी वर्दी अंगावर घालण्याची ध्येय आणि कुटुंबाची इच्छा यामुळे हे साध्य झाले त्याचबरोबर पुढील काळामध्ये मी माझी सेवा प्रामाणिकपणे व योग्य पद्धतीने करेन असे त्यांनी सांगितले या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे .असेही मत व्यक्त केले.मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा अध्यक्ष श्री नागेशजी जाधव यांनी ओंकारच्या यशाबद्दल बोलताना ओंकारच्या यशाने ग्रामीण नवयुवकांना एक प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.