बारामती ! सदोबावाडी येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात नागरिकांना विविध योजनांचा लाभ
बारामती : तालुक्यातील सदोबाचीवाडी ग्रामपंचायत येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड ८९, बेबी केअर कीट १, एचटीपी २, ग्रामपंचायतीमार्फत नमुना क्रमांक ८ चे उतारे २२, मृत्यू दाखला १ याप्रमाणे लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्नाचा दाखला ३, सोलर वाटर हीटर ४, पीठ गिरणी २८, शिलाई मशीन १२, तेलघाणा १, जनावरांसाठी गोठा बांधणे ४, शेळीपालनासाठी निवारा २, संजय गांधी निराधार योजना २ आणि दुबार शिधापत्रिकेसाठी ९ याप्रमाणे नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी सरपंच मनीषा होळकर, उपसरपंच ऋषीकेश धुमाळ, सदस्य परवीन जमीर शेख, अधिकारी संतोष नलवडे, ग्रामसेवक सौरभ लोणकर, तलाठी अशपाक इनामदार, कृषी सहायक मिथुन बोराटे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थितीत होते.