सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजिंक्य साळी होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.
नुकत्याच कझाकिस्तान येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत बारामती मधील आयर्न मॅन हा बहुमान मिळालेल्या अजिंक्य साळी यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी या स्पर्धेबद्दल माहिती सांगून मुलांनी या स्पर्धेकडे वळाले पाहिजे असे नमूद केले, जीवनाचा खडतर प्रवास करून कसा आयर्न मॅन झालो याची माहिती सांगितली व 'आरोग्य हीच खरी संपत्ती' आहे हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारला पाहिजे असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वायदंडे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून, विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून तसे प्रयत्न केले पाहिजे, तसेच आपली ध्येयही मोठी असली पाहिजे व ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असे असे विचार व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता भोईटे, पर्यवेक्षिका सणस मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली व मनोगता नंतर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन कु.राजगौरी घाडगे, कु.विशाखा कदम, कु. अहिल्या ठोंबरे, कु. मधुरा टिके तर आभार विशाखा कदम हिने मानले.