बारामती ! हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा साजर
बारामती - गुरुंप्रती आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस अर्थात गुरुपौर्णिमा म.ए.सो चे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती. येथे सोमवार,दि. ०३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
तद्प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मंचावर आगमन झाल्यावर स्वागत समारंभ झाला सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सरस्वती स्तवन म्हटले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका दिपाली पवार यांनी केले व त्यानंतर लाभलेले मान्यवर डॉ. श्री. शशांक जळक आणि सौ. कोयल जळक यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपस्थित शाला समितीचे महामात्र डॉ. श्री. गोविंद कुलकर्णी सर व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री. राजीवजी देशपांडे, श्री. पी.बी. कुलकर्णी सर यांचेही स्वागत करण्यात आले. तद्नंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला.
सत्कारानंतर इ. ८वी च्या विद्यार्थ्यांनी "गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा हे गीत सादर केले. शाळेचे महामात्र मा.डाॅ. श्री.गोविंद कुलकर्णी सरांनी सर्वांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. इ.३री तील चि.ईशान वर्दकर , इ.६वी तील कु.श्रावणी वसावे तर इ.८वी मधून कु.वेदिका लोणकर यांनी गुरु-शिष्यांच्या कथा सांगितल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका स्पष्ट करताना महर्षी व्यासांची कथा व वेदांची उत्पत्ती सांगितली.
उपस्थित मान्यवर डॉ. श्री. शशांक जळक यांनी पारंपारिक गुरु-शिष्यांच्या जोड्यांचे स्मरण करत महत्व ही नमूद केले. त्याबरोबर त्यांच्या शाळेतील स्मृतींनाही उजाळा दिला.
या प्रसंगी इ.१०वी ची विद्यार्थिनी कु.निधी हेमाडे हिने आभार प्रदर्शन केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.