सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीशराव लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. महेंद्रसिंह जाधवराव व उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले.
यावेळी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयांमध्ये उपलब्ध शैक्षणिक सुविधा याविषयी मार्गदर्शन केले, उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्था व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले तर आभार पर्यवेक्षिका सणस मॅडम यांनी मानले.