जेजुरी ! 'त्या' अहवालाबाबत जेजुरी
पोलिसांत तक्रार दाखल
बनावट सही-शिक्का उमटवून ज्या कोणी हा अहवाल दिला त्यांचा शोध घेत कडक कारवाई व्हावी.
जेजुरी - जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त पदासाठी जेजुरी शहरातील इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या अर्जानंतर, त्यांचा चुकीचा व बदनामीकारक माहिती अहवाल पुणे सह
धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे देवस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यांच्या सही व शिक्क्यानिशी प्राप्त झाला होता. तो अहवाल जेजुरीकरांना मिळाल्याने ग्रामस्थांनी देवसंस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यांना सोमवती
अमावस्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत विचारणा केली. मात्र, मी अशा प्रकारचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. माझा बनावट सही-शिक्का उमटवून हा अहवाल दिल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात, मुख्याधिकारी जगताप यांनी जेजुरी पोलीस
स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. माझा बनावट सही-शिक्का उमटवून ज्या कोणी हा अहवाल धर्मादाय आयुक्तांना दिला आहे, त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी विनंती अर्जात केली आहे. पोलिसांकडून या तक्रारीप्रकरणी तपास केला जात आहे.