देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
पुरंदर तालुका प्रमुख (सिकंदर नदाफ)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घेण्यात आलेल्या पुरंदर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्याची माहिती भाजपचे युवा नेते अजिंक्य टेकवडे यांनी दिली.
यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे तसेच सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात करण्यात आली होती.यामध्ये पुरंदरसह बारामती नाशिक वाई हडपसर पुणे आदी भागातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता.
या स्पर्धेत खुल्या गटात नाशिकचा अंकित कुमार हा विजयाचा मानकरी ठरला असून मुलींच्या गटात श्रीगोंद्याची अश्विनी हिरडे हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर गटनिहाय स्पर्धेत सुमित राठी बाळू पोकळे मनीषा मोटे शिवानी यादव काव्या देशमुख हे विजयी ठरले असून स्पर्धेतील विजेत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी स्पर्धेचे आयोजन माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पुरंदर तसेच सह्याद्री वाँरीअर्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.तर या स्पर्धेसाठी भाजपचे विभागीय अध्यक्ष जालिंदर कामठे यांसह शैलेश तांदळे युवा नेते संतोष जगताप संदीप देवकर आनंद जगताप प्रतिक म्हेत्रे संदीप नवले प्रशांत रासकर बजरंग चाचर वैभव दवणे किरण लिंभोरे दत्तात्रेय शेंडकर उदय भोसले आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.
चौकट ; स्पर्धेत मराठा बटालियनचे २४ स्पर्धक..
पुरंदर मॅरेथॉन स्पर्धेत मराठा बटालियनचे २४ फौजी सहभागी झाले होते.यावेळी स्पर्धेतील ५०० हून अधिक खेळाडूंना टी शर्ट यासह स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले .तसेच विजयाचा मानकरी ठरलेला अंकित कुमार यास रोख रक्कम २१ हजार व सन्मान चिन्ह तसेच इतरही विजेत्यांना अनुक्रमे बक्षीसांचे वाटप करण्यात आले असल्याचे युवा नेते अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले.