"डिजिटल मीडिया एक संघ" या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात
पुणे - डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची नुकतीच डिजिटल मीडिया एक संघ संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली ..तसेच अक्षय थोरात हे AV9 मराठी पुणे प्रतिनिधी असून अनेक घटकांना आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले असून तशी त्याची ओळख आहे ...तसेच ही निवड करत असताना सर्व डिजिटल पत्रकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मोडून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याकरिता आपली नियुक्ती करण्यात येत आहे.असेही त्यांनी बोलताना सांगितले
डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या एक मताशी आपल्याला पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले आहे
आपण आपल्या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही ही दक्षता बाळगावी अशीही सूचना या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.. तसेच या निवडीबद्दल डिजिटल मीडिया एक संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.