उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "साई सेवा मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल" मध्ये महाआरोग्य निदान शिबिर संपन्न.
सोमेश्वरनगर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असणाऱ्या साई सेवा मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु ,सोमेश्वरनगर येथे महाआरोग्य निदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केप कापत साजरा करण्यात आला तसेच आयोजित शिबिरांतर्गत ४५० पेक्षा जास्त रुग्णांना सहभाग घेतला या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, संधिवात,पोटाचे विकार, काविळीचे विकार, कावीळ प्रतिबंधात्मक (हेपेटाइटिस बी)लस, कावीळ ब व कावीळ क याच्या मोफत तपासण्या तसेच बीपी पल्स ऑक्सिजन शुगर इत्यादी, अश्या ६६०० रुपये प्रत्येकी तपासण्या मोफत करण्यात आल्या. पोटाचे ऑपरेशन, हाडांची ऑपरेशन, सांधे बदल शस्त्रक्रिया (जॉइंट रिप्लेसमेंट) यामध्ये ५० ते ८०% सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत .अशी माहिती डॉ विद्यानंद भिलारे व डॉ राहुल शिंगटे यांनी दिली , शिबिर करता डॉ विद्यानंद भिलारे एमडी मेडिसिन, डॉ क्षितिज कोठारी डीएम गॅस्ट्रोलॉजिस्ट पुणे डॉ शुभम शहा ऑर्थो सर्जन, डॉ निता शिंगटे आहार तज्ञ डॉ जयश्री भिलारे त्वचा विकार केशविकार तज्ञ डॉ राहुल शिंगटे , डॉ सागर शिंदे एम एस जनरल सर्जन यांचे योगदान मिळाले.